विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर - कलाविष्कार ई दिवाळी अंकाला द्वितीय पारितोषिक
by प्रथमेश शिरसाट on Saturday, December 24, 2011 at 12:07am
___________________________________________________________
विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर
जयसिंगपूर / प्रतिनिधी
मराठी
संस्कृतीला भरभरून देणाऱ्या दिवाळी अंकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्या
करिता व दिवाळी अंकांच्या वैश्विक पातळीवरील संवर्धनासाठी जयसिंगपूर येथील “अलिशा अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज”
च्यावतीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात. 103 वर्षाची दिवाळी अंक
परंपरा ही खास मराठी अभिरुचीचे प्रतिक आहे. दिवाळी अंकाची परंपरा अखंड
राहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या सदहेतूने ही
स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.




